01:20pm | Jun 10, 2023 |
सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १८ जून ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात १८ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार आहे. त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करून २३ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान १७ जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते २१ जून रोजी १२ वाजेपर्यंत फलटण येथून नीरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळविण्यात येत आहे. १७ जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २० जून रोजी १२ वाजेपर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे.
१७ जून ते २१ जून या कालावधीत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. २१ जून ते २३ जूनपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. २१ जून ते २३ जूनपर्यंत नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पूल येथून बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. २१ जून ते २३ जून या कालावधीत नातेपुतेकडून फलटणमार्गे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहिगाव-जांब- बारामतीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. २२ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी सहा वाजता मार्गस्थ होणार आहे.
यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रस्त्याने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी-शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील, याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे समीर शेख यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |