सातारा : सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात विकास कामांचे जे नारळं फुटत आहेत आणि त्या निमित्ताने जी फ्लेक्स बाजी होत आहे, त्या खर्चातून सातारा शहरातील एखाद्या गटाराचे किंवा रस्त्याचे काम झाले असते. बोगस बिले, मर्जीतले ठेकेदार, आणि विकासकामे मात्र काहीच नाही सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात बहुमताच्या जोरावर केवळ नौटंकी केली. काही लोक रस्त्यावर बाईक चालवतात त्यापेक्षा पाच वर्ष पालिका नीट चालविली असती तर बरे झाले असते असा घणाघाती टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांना त्यांचे नाव न घेता लगाविला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शंभर बेड हॉस्पिटलची घोषणा सातारा दौऱ्यात केली होती. या हॉस्पिटल्ससाठी जुना दवाखाना (शाही मशिद) येथे उभारणी करावी असे निवेदन शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याची माहिती देण्याच्या निमित्ताने संवाद साधणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, काही लोक विकास कामांच्या उद्घाटनांसाठी दुचाकीवरून गेल्याचे समजले, विकास कामांच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी केवळ नौटंकी केली. दुचाकी चालविण्यापेक्षा पाच वर्ष सातारा पालिका व्यवस्थित चालविली असती तर बरे झाले असते. आता सातारा पालिकेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी सातारकरांना भुलविण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. दुसऱ्यांच्या कामांवर जाऊन फोटोसेशनं करायचे आणि सगळी कामे आम्हीच केले असे सांगायचे ही प्रवृत्ती सातारकरांना ज्ञात आहे, ये जो पब्लिक है वो सब जान ती हे, लोक काय म्हणतील ते यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना समजाणारच आहे. पालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्ष बहुमताच्या जोरांवर प्रचंड बेकायदेशीर कामे केली या कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. विद्यमान नगराध्यक्षांचे शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष अभिनंदन केले. त्यांच्या पत्रिकेतील ग्रह चांगले आहेत त्यांना मागील नगराध्यक्षांप्रमाणे नशीब रजेवर नाही पाठविले असा टोला त्यांनी लगाविला साताऱ्याचा ग्रेड सेपरेटर हा साताऱ्यातील प्रेक्षणीय स्थळं म्हणून जाहीर करा अशी उपरोधिक मागणी सुध्दा त्यांनी केली .
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |