01:23pm | Aug 05, 2020 |
नवी दिल्ली: तब्बल 29 वर्षांनंतर आज दि.5 ऑगस्ट रोजी तो वचनपूर्तीचा क्षण आला. 29 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द आज पाळला. नरेंद्र मोदी 1991 मध्ये 29 वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते. यावेळी त्यांनी जेव्हा राम मंदिर उभं राहील तेव्हाच आपण पुन्हा अयोध्येत येऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार नरेंद्र मोदी आता तब्बल 29 वर्षांनी अयोध्येत पोहोचले आहेत. योगायोगाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने भूमिपूजनाचा मानही त्यांनाच मिळाला आहे.
नरेंद्र मोदी 1991 मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. तेव्हा महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेल्या फोटोत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदीदेखील कॅमेर्यात कैद झाले होते. नरेंद्र मोदी भाजपाचा मुख्य चेहरा म्हणून समोर आल्यानंतर हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. महेंद्र त्रिपाठी त्यावेळी विश्व हिंदू परिषदेसाठी फोटोग्राफर म्हणून काम करत होते. रामजन्मभूमीजवळच त्यांचा स्टुडिओ होता.
‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले होते. ही यात्रा कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधितही केलं होतं. महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असं विचारलं असता ज्या दिवशी राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल तेव्हा मी पुन्हा येईन असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार नरेंद्र मोदी 29 वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेलं ते आश्वासन पूर्ण करत असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत हजर झाले आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |