मुंबई : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला असून त्या दृष्टीकोनातून अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. शिक्षण मंडळाकडून याकरिता तयारी सुरु करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार
कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच महावद्यालये काही दिवसात सुरू करण्यासंदर्भातील निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. येत्या 24 जानेवारीपासून राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी अशा सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील कॉलेजदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून सुरू करण्याच्या निर्णय घेतला जाईल असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |