सातारा : करंजेमधील आंदेकर चौकात रविवारी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. रस्त्याकडेला सडलेल्या अवस्थेत दुर्गंधी पसरल्यानंतर त्याची माहिती समोर आली. दरम्यान, घातपाताची परिसरात चर्चा असून रात्री उशीरापर्यंत शवविच्छदेन करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, आंदेकर चौक वर्दळीचा परिसर आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा पसरलेला असून त्यातून कमालीची दुर्गंधी पसरली होती. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पाहिले असता तेथे एका पुरुषाचा मृतदेह होता. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी होवू लागली. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. सुमारे दोन तासानंतर मृतदेह सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आला.
मृतदेह अनोळखी पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे 50 आहे. उंची 5 फूट 5 असून अंगात पांढर्या रंगाचा चेक्सचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे जर्कीन व पायात स्पोर्ट शूज आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह भंगार गोळा करणारा, फिरस्ता व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तीच्या वर्णनावरुन त्याची मिसिंग तपासली असता तशी कुठे नोंद नव्हती. पोलिस त्याबाबत परिसरातही माहिती घेत आहेत.
दरम्यान, करंजेत मृतदेह सापडल्यानंतर तेथे पोते होते. ते पोते मृतदेहाच्या अंगावर होते. घटनास्थळावर त्याबाबत घातपात केल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात होती. पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता सपोनि विशाल वायकर म्हणाले, शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजून येईल. रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन सुरु असून मृताची ओळख पटवण्याचे पोलिस काम करत आहेत. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |