मेढा : सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या पेशंटस् च्या संख्येने सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स फुल्ल झाली आहेत. ऑक्सिजनची गरज असणार्या पेशंटस् ना ऑक्सिजन बेड अभावी प्राण गमवावे लागत आहेत. ग्रामीण भागामध्ये तर या सुविधा उपलब्धच होत नाहीत. त्यामुळे जावली तहसीलदार शरद पाटील यांनी जावली तालुक्यामधील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांना मदतीचे आवाहन केले होते.
तहसीलदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनमित्र फाउंडेशन मेढा यांनी जेष्ठ सहकारी कै.भानुदास देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पोर्टेबल ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर मेढा ग्रामीण रूग्णालयास भेट दिले.
याप्रसंगी तहसीलदार शरद पाटील यांनी जीवनमित्र फाउंडेशन च्या उपक्रमांविषयी गौरवोद्वागार काढले व कोरोनाच्या संकटसमयी सामाजिक भान ठेवून केलेले कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. बीडीओ सतिश बुद्धे व वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव यांनी जीवनमित्र फाउंडेशनला धन्यवाद दिले.
या मशीनमुळे जावली तालुक्यामधील रूग्णांची चांगली सोय झाली आहे व याने एकातरी व्यक्तीचे प्राण वाचले तरी आमचा हेतू साध्य होईल, असे सोमनाथ काशिळकर यांनी यावेळी सांगितले.
हे ऑक्सिजन मशीन मेढा येथे मा. तहसीलदार व कै.भानुदास देशमुख यांचे चुलते मन्याबापु देशमुख यांच्या हस्ते ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव यांच्याकडे सुपुर्त केले. या प्रसंगी जावली पंचायत समितीचे बीडीओ सतिश बुद्धे, जीवनमित्र फाउंडेशन चे संस्थापक सोमनाथ काशिळकर, खजिनदार सुहास पाटील, शरद रांजणे, रफिक शेख, ज्ञानेश्वर वेंदे गुरूजी व इतर मान्यवर उपस्थित होते. शरद रांजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |