05:20pm | Jan 13, 2021 |
पुसेगाव: वीज उपकेंद्रे व यंत्रचालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वीज प्रशासन उदासीन असल्याने दि.19 जानेवारी पासून औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर यंत्रचालक संघटना बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे यंत्रचालक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जायभाये, कार्याध्यक्ष सुधीर इंगळे व उपाध्यक्ष विश्वास साळुंके यांनी सांगितले. कोषाध्यक्ष राजेश्वर क्षीरसागर, उप सरचिटणीस खेमराज तिवाडे, संयुक्त सचिव राजेश बडनखे, माधव गोरकवाड, राजेसाहेब रोंगे पाटील, सोपान पेदे यांनी सांगितले.
वीज महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा भाग येतो. विभागातील वीज उपकेंद्रे देखभाल दुरुस्ती व प्राथमिक सोयी सुविधांअभावी धोकादायक बनलेली आहेत. ऑपरेटरांची अपूरी संख्या, गरज असूनही सुरक्षारक्षक न देणे, त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे या ऑपरेटरच्या समस्या आहेत. मुंबई येथील मुख्यालय व औरंगाबाद विभागीय कार्यालयातुन वीज पुरवठा अखंडित राहण्याकरिता मार्गदर्शनपर विविध परिपत्रके सबस्टेशन व कर्मचार्यांना दिली जातात. परंतू या मार्गदर्शनपर परिपत्रकांची अंमलबजावणी होत नाही. याशिवाय कंपनीची गरज म्हणून नाईलाजास्तव, आणीबाणी परिस्थितीत ऑपरेटरांना अतिरिक्त काम करावे लागते, परंतू त्या कामाचा मोबदला औरंगाबाद विभागात देण्यात येत नाही. सन 2017 मध्ये औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय निर्माण झाले, कंपनीच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी परिपत्रक काढून अतिकालीन कामावर व त्याच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यात यावे, बाह्य यंत्रचालकांचा पुल करावा, मागील अतिकालीन कामाची देयके तात्काळ निकाली काढा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू यामुळे केवळ अतिकालीन कामाची देयके थांबविण्यात आली. प्रत्यक्षात अतिरिक्त मनुष्य बळ उपलब्ध करण्यात आले नाही. परिणामी ऑपरेटरांना अतिरिक्त काम करावेच लागले आहे. त्याचा मोबदला देण्याची संघटनेची मागणी आहे.
वास्तविक पाहता सबस्टेशनला प्राथमिक सुविधा नसल्याने अतिरिक्त काम करण्याची ऑपरेटरांची इच्छा नाही. तरीही कंपनीचे हिताकरिता ऑपरेटर बांधव व महाराष्ट्र राज्य यंत्रचालक संघटना सहकार्य करीत आहेत असे या संघटनेचे सरचिटणीस नवनाथ पवार यांनी सांगितले. याबाबत संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार व चर्चा केल्या. प्रादेशिक विभाग कार्यालयाने स्पष्ट सूचना देऊनही वरील समस्या सोडविण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. परंतु त्या सूचनांकडे दुय्यम कार्यालयांनी दुर्लक्ष केल्याने यंत्रचालकांवर व सबस्टेशनवर अन्याय होत आहे. यामध्ये ऑपरेटरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सबस्टेशनला किमान प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. याकरिता संघटनेला नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. संघटनेने महावितरण प्रशासनाला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून सप्टेंबर 2020 मध्ये पत्र लिहून केवळ मराठवाड्यातील ऑपरेटरांवर होत असलेला आर्थिक अन्याय दूर करण्याची विनंती केली होती.
परंतू त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संघटनेने डिसेंबर महिन्यात निवेदन देऊन नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला होता. त्यानुसार दि.4 जानेवारी 2021 रोजी आंदोलनाची रितसर नोटीस देऊन दि.19 जानेवारीपासून मराठवाड्यातील यंत्रचालक औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे कळविलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील इतर तीन प्रादेशिक विभागांमध्ये सुरक्षारक्षक, प्राथमिक सोयीसुविधा व अतिरिक्त कामाचा मोबदला तातडीने देण्यात येतो. परंतु केवळ मराठवाड्यातील भाग हा अतिदुर्गम असूनही यंत्रचालकांवर महावितरण’कडून अन्याय केला जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. दि.19 रोजीच्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद सहभागी होणार असून, वेळीच दखल घेऊन यंत्रचालकांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेच्यावतीनेकोषाध्यक्ष राजेश्वर क्षीरसागर, उप सरचिटणीस खेमराज तिवाडे, संयुक्त सचिव राजेश बडनखे, माधव गोरकवाड, राजेसाहेब रोंगे पाटील, सोपान पेदे यांनी केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |