09:10pm | Nov 28, 2022 |
सातारा : मालमत्ता कराचे 19 लाख 3 हजार 412 रुपये थकवणाऱ्या माजी नगरसेवकाचे सदर बझार येथील चार गाळे सातारा पालिकेने सील केले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या वसुली विभागाने एकदम आक्रमक पवित्रा घेतल्याने भल्या भल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर बाजार येथील रोहन हाइट्स या इमारतीत एका माजी नगरसेवकाचे चार गाळे आहेत. या गाळ्यांची गेल्या 20 वर्षापासून 19 लाख 3 हजार 412 रुपयांची थकबाकी आहे. संबंधित मिळकत धारकांना थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणती हालचाल न झाल्याने अखेर प्रशासक व मुख्याधिकारी आभिजीत बापट यांच्या आदेशानुसार सोमवारी रोहन हाईटस या इमारतीमधील चार गाळ्यांना सील ठोकण्यात आले.
या कारवाईत वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर, सुभाष राठोड, गणेश कांबळे, छोटू बागुल यांनी भाग घेतला. वसुली विभागाने बडी बडी धेंडे रडारवर घेतल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मागील वर्षाची थकबाकीचा आकडा 21 कोटी पेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याच्या जास्तीत जास्त वसुलीसाठी वसुली विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढेही ही वसुली मोहीम गतीने सुरू राहणार असल्याचे वसुली अध्यक्ष प्रशांत खटावकर यांनी सांगितले आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |