01:57pm | Dec 31, 2020 |
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाचा तपास अद्याप संपला नाही. याप्रकरणी सीबीआयने कोणतीही शक्यता फेटाळली नाही. आता यापुढील तपास करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. यासंदर्भात खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना दिलेल्या पत्रात तपास अजून सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याप्रकरणी निकालाबाबत प्रत्येकालाच उत्सूक्ता आहे.
खासदार सुब्रमण्यम स्वामींनी जुलैमध्ये पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र लिहून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास कुठपर्यंत आला अशी विचारणा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र सीबीआयकडे पाठवलं होतं. आता 30 डिसेंबर रोजी सीबीआयने याचं उत्तर दिलं असून त्यामध्ये सांगितलं आहे की, अजून या प्रकरणाचा तपास पूर्णपणे संपवला नाही. सीबीआयने या पत्रात सांगितलंय की, ते अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून आता यामध्ये अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
देशाच्या सर्वोच्च तपास संस्थेने सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून घेऊन आतापर्यंत 145 दिवस झाले आहेत. तरीही या प्रकरणात एकही नवी माहिती समोर आली नाही. तसेच एम्सच्या अहवालावरही काहीच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत नाही. अद्याप तपास सुरु आहे एवढंच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत आहे.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास स्वत: कडे घेऊन जवळपास पाच महिने होत आहेत. दरम्यानच्या काळात ऑक्टोबर महिन्यात एम्सने सीबीआयला एक फॉरेन्सिक अहवाल दिला होता. त्यामध्ये सुशातंचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झालेला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. या एम्सच्या अहवालावर सीबीआयचं नेमकं काय मत आहे हे अद्याप समोर आलं नाही आणि त्याचा कुठेही उल्लेख या पत्रामध्येही नाही.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |