02:49pm | Feb 18, 2021 |
सातारा: दरजाई (ता.खटाव) येथे मित्राच्या मदतीने बापाचा खून करणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगांव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. पवन संपत सत्रे (वय28, रा.दरजाई, ता.खटाव), सौरभ अशोक कदम (वय 23), युवराज मोहन जाधव (वय35) दोघेही रा. वडूज, ता.खटाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.17 फेब्रुवारी रोजी दरजाई (ता.खटाव) येथील शेतकरी संपत गुलाब सत्रे (वय 55) हे शेतातील काम संपवून आपल्या राहत्या घरी पायवाटेने चालत जात असताना अंधाराचा फायदा घेवून डोक्यात वार करून निर्जनस्थळी त्यांचा खून करण्यात आला होता. खूनानंतर अज्ञात आरोपींनी काही धागेदोरे मागे न सोडता घटनास्थाळावरून पलायन केले होते. दुसर्या दिवशी संपत सत्रे यांचा अंत्यविधी करण्यात आला. तरीसुध्दा आरोपींचा धांगपत्ता लागला नव्हता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे संयुक्तरित्या करत होते. पथकाने दरजाई व आजूबाजूच्या परिसरात बातमीदारांचा उपयोग करून खून झालेल्या संपत सत्रे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासून त्यांचा मुलगा पवन सत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने वडिल शेतजमीन विकून पैसे दे नसल्याच्या कारणावरून मित्र सौरभ अशोक कदम व युवराज मोहन जाधव (वय 35) दोघेही रा. वडूज यांच्या मदतीने वडिल शेतातून घरी जात असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना त्यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारून खून केला. खूनानंतर वडिल घसरून पडून जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला असे भासविण्यासाठी त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवण्यात आला, अशी माहिती सांगितले. सौरभ अशोक कदम याला ताब्यात घेतला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. खूनाच्या घटनेनंतर चोवीस तासाच्या आत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांना यश आले असून तिघांच्यावर कलम 302 अन्वये पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक लोंढे- पाटील, सहाय्यक फौजदार तानाजी माने, पोलिस हवालदार सुधीर बनकर, पोलिस नाईक अर्जुन शिरतोडे, पोलिस कॉन्स्टेबल मयुर देशमुख, संकेत निकम, संजय जाधव, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदराव जगताप, पोलिस हवालदार चंद्रहार खाडे, सचिन खाडे, आनंदराव गमरे, पुष्कर जाधव, सचिन जगताप, सचिन माने, गणेश मुंडे, इम्तियाज मुल्ला यांनी सहभाग घेतला.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |