09:27pm | Jan 24, 2023 |
कोरेगाव : तडवळे सं.वाघोली ता.कोरेगाव येथील तुळजाभवानी स्टोन क्रशर पर्यावरणाचे कोणतेही नियम पाळत नाही. कायदा पायदळी तुडवून हे क्रशर सुरू असून हे क्रशर ताबडतोब बंद करण्यात यावे अन्यथा दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्याना दिले आहे.
रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तडवळे सं.वाघोली येथील तुळजाभवानी स्टोन क्रशर हे देऊर येथील राहुल बबन कदम यांचे आहे. हे क्रशर महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. याप्रकरणी आपण दि. 27.11.2022 रोजी निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये हे क्रशर पर्यावरणाचे सर्व नियम डावलून सुरू असलेच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप हे क्रशर सुरू आहे. दि.25 पर्यंत हे क्रशर बंद न झाल्यास दि. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. यामध्ये माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्व अधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, मुबंई, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, सातारा, पोलीस अधीक्षक, कोरेगाव तहसीलदार, प्रांत कार्यालय, कोरेगाव यांनाही देण्यात आल्या आहेत.
क्रशर मालकावर गुन्हा दाखल करा
तुळजाभवानी स्टोन क्रशर सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करून याची चौकशी करून स्टोन क्रशरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही रमेश उबाळे यांनी केली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |