04:58pm | Jan 20, 2022 |
सातारा : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय मागे घेऊन कोरोना निर्बंधांसहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी भाजपा साताराने आक्रमक पवित्रा घेतला असून या बाबतचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्यामार्फत हे निवेदन भाजपा शैक्षणिक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष अमितजी कुलकर्णी यांनी हे निवेदन दिले. या वेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, आशुतोष चौधरी, अविनाश खर्शिकर, ओंकार रामदासी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम, अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढून सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. तसेच राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधून दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असून त्यांच्यावर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत, त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षांवरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत. राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. सरकारने दि. 26 जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |