पुसेसावळी : उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत मारामारी, जबरी चोरी, दुखापत करणार्या टोळीचा प्रमुख विशाल लक्ष्मण कुकले (वय-21 वर्षे), खंडया ऊर्फ खंडु प्रल्हाद जाधव (वय -30 वर्षे), विशाल बळीराम माने (वय-30 वर्षे) सर्व रा. उंब्रज, ता.कराड, जि.सातारा अशी टोळी तयार झाली होती. त्यांनी कराड तालुक्यात मारामारी,जबरी चोरी करुन नुकसान करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे असे गुन्हे केलेले आहेत. या टोळीतील वरील तीन इसमांना हद्दपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षक सातारा तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. त्या हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होवुन त्यांना तेजस्वी सातपुते, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये वरील तीन इसमांना कराड,पाटण,सातारा या तीन तालुका हद्दीतुन 1 वर्षे (एक वर्षे) या कालावधी करीता हद्दपार केले बाबतचा आदेश केला आहे.
वरील टोळीतील इसमांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे या तिघांकडून कराड तालुका हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक यांनी वरील प्रमाणे हद्दपार आदेश केलेले आहेत. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाचे आत त्यांना सातारा, कराड, पाटण तालुका हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे. या कारवाईबाबत सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये भिती, दहशत पसरविणार्या गुंडांचे व चोर्या, मारामारी करणार्यांच्या विरुध्द त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |