11:13pm | May 19, 2020 |
सातारा : निकट सहवासाची साखळी तुटता तुटत नसल्याने सकाळी जिल्ह्यात कोरोना बाधित 8 रुग्ण सापडले असताना आज रात्री उशिरा पुन्हा कोरोना बाधित असलेले 20 नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 166 झाली असून दोन कैदी कोरोनामुक्त झाले असले तरी आज झालेल्या विस्फोटामुळे जिल्ह्यातील वातावरणा भयकंपित झाले आहे.
परजिल्ह्यातून येणार्यांसोबत संसर्गाची दहशत येत असल्याने सातारा जिल्हावासीयांना कोरोनाचा धोका कायम आहे. सातारा जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली असताना मुंबई व पुण्याहून सातारा जिल्ह्यात येत असलेल्या चाकरमान्यांमुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढत चाललेली संख्या जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. आज सकाळीच खंडाळा, खटाव व कराड तालुक्यात 8 बाधित रुग्ण समोर आले होते. तसेच जिल्हा कारागृहातील दोन कैदीही कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण दिलासादायक होते. मात्र असे असताना रात्री उशिरा प्रशासनाकडून 20 जण कोरोना बाधित असल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिकांची पाचावधारण बसलेली आहे. आढळून आलेले हे रुग्ण जावली, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा तालुक्यात आहेत. हे सर्व बाधित मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून सातारा जिल्ह्यात आलेले आहेत.
दरम्यान परवा, बनपुरी, ता. पाटण येथील महिला होमक्वारंटाईन असतानाचा तिला त्रास होवू लागल्याने तिला कराड येथाल कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. आज रात्री उशिरा त्या महिलेचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 3 झाली आहे. सध्या हॉट स्पॉट बनलेल्या पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांमधून लोकांचे प्रचंड लोंढे गावागावात येत आहेत. त्यामुळेही ग्रामीण भागात लोक चिंताक्रांत आहेत. याचेच धक्के सध्या जिल्ह्याला बसत आहेत. आज जिल्ह्यातील 8 जणांचे तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच रात्री उशिरा जावली, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा तालुक्यातील 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यासमोर संकट वाढले आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा 166 पर्यंत पोहोचला आहे.
आजच्या आठ बाधितांमध्ये कराड तालुक्यातील म्हासोली येथील कोरोनाग्रस्ताच्या निकट सहवासातील दोन पुरूष (वय 45 व 62) आणि तीन महिला (वय 48, 35 व 60) अशा पाच रूग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असलेला मुंबईहून लोणंदला प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी (ता. खटाव) येथील अकोला येथून प्रवास करुन आलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला हे तीन रूग्णही कोरोनाबाधित निघाले आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणार्या 31 व 58 वर्षीय जिल्हा कारागृहातील 2 कैद्यांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने या 2 रुग्णांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. हा जिल्हा कारागृहासह जिल्ह्यालाही मोठा दिलासा आहे. दरम्यान, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दि. 18 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 32 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 166 झाली आहे. आजअखेर 75 रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |