बुध: खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय कृष्णा मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज वसंत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
पुसेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता.27) दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी विजय मसणे तर उपसरपंच पदासाठी पृथ्वीराज जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी तथा विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी एन.एम.नाळे यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली. यावेळी रणधीरशेठ जाधव, सुरेशशेठ जाधव, विशाल जाधव, कमरुनिसा शिकलगार, दिपाली जाधव, सुरेखा जाधव, स्नेहा मदने, अभिजित जाधव, दिपाली तारळकर, शकुंतला जाधव, पृथ्वीराज जाधव, मधुकर टिळेकर, मोनिका जाधव, संजय जाधव, दिपाली मुळे, सुप्रिया जाधव असे 15 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान पुसेगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रणित श्री सेवागिरी महाविकास आघाडीने 17 पैकी 14 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन एकहाती सत्तांतर केले. तर सत्ताधारी श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, माजी चेअरमन अॅड.विजयराव जाधव, श्री.सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व माजी पं.स.सदस्य मोहनराव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, योगेश देशमुख, संतोष तारळकर, राम जाधव, दत्ता जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |