कराड : रोटरी क्लब ऑफ कराड दिनदर्शिका 2022 चा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, सचिव अभय पवार, रोटरी परिवारातील असिस्टंट गव्हर्नर डॉ. राहुल फासे, प्रोजेक्ट चेअरमन राजेश खराटे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर वैभव कांबळे व रोटरीचे सर्व सन्मानित सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या या दिनदर्शिकेमधून सेवन एरिया ऑफ फोकस, फोर व टेस्ट आणि रोटरी क्लब कराडचे रोटरी अन्नछत्र अन्नदान; घास मायेचा या विषयांची माहिती देण्यात आली आहे. डॉ. रणजीत पाटील यांनी रोटरीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच समाजासाठी करत असलेल्या अनेक सामाजिक प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, बी. आर. पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या दिनदर्शिकेसाठी स्पॉन्सरशिप दिलेल्या सर्व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत चंद्रकुमार डांगे यांनी केले. सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले. राजेश खराटे यांनी दिनदर्शिकेचे माहिती दिली. आभार अभय पवार यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी रोटरी सदस्य कॉप्स चेअरमन शशांक पालकर, इंद्रजीत चव्हाण, अनघा बर्डे, मदन कोकीळ, राजेंद्र कुंडले, संदीप कोटणीस, जयंत जगताप, आनंदराव थोरात, रवींद्र देशमुख, मुकुंद कदम, राहुल पुरोहित, चंद्रशेखर पाटील, अभिजीत चापेकर, डॉ. सोहम शिरसागर, प्रवीण परमार, जगदीश वाघ, वैभव डुबल, गजानन माने, राजू खलीपे, रघुनाथ डुबल, डॉ. संतोष टकले, किरण जाधव, विक्रांत जाधव, अभिजीत गोडसे, प्रबोध पुरोहित, सुहास पवार उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |