11:50am | Oct 21, 2020 |
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा नजीक शिवराज पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना अज्ञात इसमांनी दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी असून या घटनेतील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की मंगळवारी रात्री डोलारे व हिंडे हे दोन पोलीस कर्मचारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गानजिक असणाऱ्या शिवराज पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना अंधारामध्ये सुमारे चार ते पाच अज्ञात इसम दिसून आले. त्या अज्ञात इसमाना हटकले असता त्यांनी अचानकपणे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवले असता त्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दिनापूर्वी मध्यरात्रीला ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली होती, यात काही पोलिसही जखमी झाले होते. तद्नंतर प्रथमच पोलिसांवर अशाप्रकारे भ्याड हल्ला करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |