04:23pm | Sep 25, 2021 |
सातारा : सातारा ते पुणे अशियाई महामार्गाची (एन.एच.४) अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारे आहे. अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि, सातारा जिल्हावासियांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार ना. गडकरी यांनी येत्या तीनचार महिन्यात महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ना. गडकरी कराड दौऱ्यावर आले असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि महामार्ग दुरुस्तीसंदर्भात खड्ड्यांच्या छायाचित्रांसहित लेखी निवेदन देऊन चर्चा केली. सातारा ते पुणे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले असून वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट काम झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच महामार्गाची आणि सेवा रस्त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था, दुर्दशा झालेली आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधीत ठेकेदार यांना अनेकदा सुचना करुनही कोणतीही कार्यवाही होत नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले आहेत.
महामार्ग व सेवा रस्त्यांची दुरावस्था तसेच महामार्गावर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसताना टोल वसुली मात्र सक्तीने केली जाते. याशिवाय टोल नाक्यावर प्रशासकीय अधिकारी, आजीमाजी सैनिक आणि नागरिकांशी नेहमीच उध्दट वर्तन करुन शिविगाळ दमदाटी करण्याचे प्रकार होत असतात. आनेवाडी टोलनाक्यावर मोठा भ्रष्टाचार झाला असून हे सर्व गैरप्रकार थांबवणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात कुठेही जायचे असेल किंवा पुणे, मुंबईला जायचे असेल तर महामार्गावर यावेच लागते पण, महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दररोज अनेक छोटेमोठे अपघात घडत असून अनेकजण जायबंदी होतात तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराने सब ठेकेदार नेमले असून महामार्ग व सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेकदा आंदोलनही करावे लागले आहे. जनतेचा रोष वाढला की केवळ मलमपट्टी करुन ठेकेदार पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून बसतात. यामुळे महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून आपण स्वत: या गंभीर परिस्थितीकडे लक्ष द्यावे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि संबंधीत अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हावासियांच्यावतीने ना. गडकरी यांच्याकडे केली.
ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीची गंभीर दाखल घेऊन येत्या तीन ते चार महिन्यात सातारा ते पुणे महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आणि तसे आदेश महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, यावेळी सातारा- जावली मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सी.आर.एफ. मधून निधी देण्याची मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून याबाबतही ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |