08:56pm | Sep 27, 2022 |
सातारा : सेव्हन स्टार इमारतीमधील गाळेधारकांनी मंगळवारी आपले व्यवहार बंद ठेवून पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या कारणाचा निषेध केला. पे अँड पार्किंग परिसरात विक्रेत्यांनी बैठक घालून निषेधाच्या घोषणा दिल्या. इमारतीचे विकसक महेंद्र चव्हाण आणि एसटी महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी होत असून त्यामध्ये आर्थिक फटका गाळेधारकांना बसला आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
सातारा एसटी स्टँड परिसरातील सुमारे अडीच एकर जागा दहा वर्षांपूर्वी विकसित करण्यात आली होती. याचे विकसक साताऱ्यातील सुप्रसिद्ध ठेकेदार महेंद्र चव्हाण हे आहेत. या सेवन स्टार इमारतीमध्ये तब्बल 42 गाळे आहेत. मंगळवारी येथील गाळेधारकांनी अचानक व्यवहार बंद ठेवून निषेधाचे फलक हातात घेऊन पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. गाळेधारकांच्या तक्रारीनुसार एसटी महामंडळ आणि विकसक यांच्यामध्ये करार होऊन आणि इमारतीच्या तिन्ही बाजूला पार्किंग उपलब्ध असतानासुद्धा आम्हाला पार्किंग उपलब्ध होत नाही. इमारतीच्या दक्षिणेला असणारे पार्किंग एसटी महामंडळाच्या ताब्यात असून तेथे त्यांना गाड्या लावू दिल्या जात नाहीत. इमारतीसमोर असणारे जे पार्किंग आहे ते पार्किंग लोकांकडून वापरले जात असल्याने ती सकाळीच हाउसफुल होते. त्यामुळे सेव्हन स्टार इमारतीत खरेदीसाठी येणारा ग्राहक केवळ पार्किंगला जागा नसल्यामुळे तेथे थांबत नाही. त्याचा आर्थिक फटका आम्हाला बसतो, अशी गाळेधारकांची तक्रार आहे.
संबंधित नगरपालिकेने बांधकाम परवाना देताना पार्किंग कशा पद्धतीने ठरवून दिले हे आम्हाला समजायला मार्ग नाही. त्यामुळे गाळेधारकांना तात्काळ या प्रश्नासंदर्भात न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. गाळेधारकांनी इमारतीच्या बेसमेंट मध्ये बैठक मारून हा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हातामध्ये निषेधाचे फलक पहावयास मिळाले. मुळात एसटी महामंडळ आणि विकसक महेंद्र चव्हाण यांच्यामध्ये काय करार झाला, याची ठोसपणे माहिती समोर आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार एसटी महामंडळाने या संदर्भात पार्किंगची एक बाजू देणे अपेक्षित आहे. मात्र पार्किंगच्या सुविधेवर दोन्ही बाजूनी हात झटकले गेल्यामुळे तेथील गाळेधारकांची मात्र प्रचंड अडचण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आमचा तात्काळ पार्किंगचा प्रश्न सोडवावा, अशी गाळेधारकांची मागणी आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |