10:19pm | Sep 12, 2020 |
सातारा : शनिवारी जिल्ह्यात उच्चांकी 1086 कोरोनाबाधित नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तसेच 25 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 630 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. दिवसभरात हजाराचा टप्पा ओलांडत 1086 बाधित निष्पन्न झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजार 949 वर पोहोचला आहे. यामुळे प्रशासनाची काळजी वाढली असून अधिक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान तब्बल 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या सहाशेचा आकडा पार करीत 624 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 630 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 14 हजार 567 झाली आहे. 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
25 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, पाडळी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 36 वर्षीय पुरुष, सोनवडी पो. गातवडे येथील 72 वर्षीय पुरुष, विसावा नाका येथील 78 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोंडवे येथील 77 वर्षीय पुरुष, अंगापूर येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शागनगर सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 58 वर्षीय पुरुष, लाखा नगर वाई येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला, अंबेरी ता. वाई येथील 40 वर्षीय पुरुष, तोंडोली ता. कडेगाव येथील 70 वर्षीय महिला, वरुड ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, तर सी. सी. सी. पुसेगाव येथील 1 पुरुष, ता. कराड आगाशिवनगर येथील 62 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 65 वर्षीय पुरुष, तांबवे येथील 80 वर्षीय महिला, साकुर्डी येथील 55 वर्षीय महिला, केसे येथील 84 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 1 महिला व 3 पुरुष अशा एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 66,उपजिल्हा रुग्णालय कराड 22, उपजिल्हा रुग्णालय फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगांव 88, पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 158 असे एकूण 1124 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |