कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथील बैल बाजार मैदानावर 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपल्या भागातील कुस्ती प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक अधिकराव चव्हाण, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती या खेळाबाबत विशेष प्रेम आहे. त्यामध्ये कराडमधील खाशाबा जाधव या कुस्ती पैलवनाने ओलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. यामुळे कुस्ती अजरामर झाली. ही बाब लक्षात घेऊन आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान जिंकण्यासाठी कुस्तीगीर सज्ज आहेत.
या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मल्ल येणार असून त्यांची नोंदणी पद्धतीने कुस्ती नियोजीत केली आहे. या एकदिवसीय स्पर्धेत तब्बल ५१ कुस्त्या होणार आहेत. तसेच १३ महिला कुस्तीपटूंनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
यानिमित्त अधिकराव चव्हाण म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात तथा राज्यात कुस्ती स्पर्धेला महत्व आहे. कुस्ती हा जुना खेळ असून तो लोप न व्हावा, यासाठी कुस्तीला व कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना जपणे गरजेचे आहे. ऑलंम्पिक स्पर्धेमध्येही कुस्ती या खेळाला मान्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक खेळाडू पात्र व्हावे, यासाठी कुस्ती स्पर्धांचे ठिकठिकाणी आयोजन केले गेले पाहिजे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |