04:13pm | May 28, 2020 |
सातारा : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे एकही नागरिक उपजिविकेसाठी कामावर नोकरीसाठी व व्यवसायासाठी बाहेर पडत नाही. असे असताना विविध फायनान्स कंपन्यांनी मात्र हप्त्याच्या नावाखाली सातारा जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. जिथे खायलाच नाही, तिथे फायनान्सचा हप्ता कुठून भरायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित फायनान्स कंपन्यांना ताकीद देवून अवैध हप्ता वसुली थांबवावी, अशी मागणी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
टीव्ही, मोबाईल, चारचाकी, दुचाकी गाड्या तसेच इतर घरगुती जिवनावश्यक साहित्य जिल्ह्यातील लोकांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून हप्त्यांवर घेतलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे व महिने हे नागरिक इमाने इतबारे फायनान्स कंपन्यांचे हप्ते भरत आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जगावर बाका प्रसंग उद्भवलेला आहे. अनेक लोकांची हातावर पोटे आहेत. काही लोक व्यवसायिक आहेत, तर काही लोक नोकरदार आहेत. कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कामधंद्यांबाबतच्या सर्वच आस्थापना बंद आहेत. असे असताना लोकांना दोनवेळचे अन्न मिळत नाही, अशा वाईट परिस्थितीत हे लोक घरात बसून कोरोनाचा सामना करीत आहेत. मात्र जिल्ह्यात असलेल्या फायनान्स कंपन्यांना मात्र कोरोनासारख्या जिवघेण्या महामारीचे कसलेच देणेघेणे नाही. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात सरकारी, खाजगी बँका तसेच खाजगी फायनान्स ला ग्राहकांकडून बेकायदेशीर वसुली करु नका, असे बजावले आहे. असे असताना मयताच्या टाळूवरील लोणी खाणारी खासगी फायनान्स जमात ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या घरात घुसून जबरदस्तीने हप्तेवसुली करीत आहेत. तसेच लोकांच्या अकौंटवर असणारी रक्कम ऑनलाईन प्रक्रियेने कापून घेतली जात आहे. त्यामुळे लोकांची मोठी कुचंबणा झाली आहे. एखाद्याने हप्ता देण्यास विरोध केल्यास फायनान्स कंपनीचे गुंड त्यांना घरात घुसून मारहाण करीत आहेत. अशा अनेक घटना यापूर्वी सातारा जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा खासगी फायनान्स कंपन्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे आपण हिसका दाखवावा. साथरोग काळामध्ये ग्राहकांची लूट करणार्या फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करुन त्यांना त्यांची जागा दाखवावी. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला यासंदर्भात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही रिपाइं (ए)चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |