खूप अवघड असतं
बाई होऊन जगणं
बाई पणाच्या जाणिवा जपत
समाजात वावरण
स्त्री मग ती कोणत्याही रुपात असो आई, ताई, बायको, आजी, बहीण, मुलगी,... अशा कोणत्याही रुपात ती प्रेम, माया, सहनशीलता, कणखरता अशा संमिश्र भावनांचा मिलाफ घेऊन ती येते आणि जगते. लहानपणी भाऊ जेव्हा हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळतो तेव्हा ती कुठंतरी कोपर्यात भातुकली मांडून बसलेली असते. स्वप्नात रमते, स्वतःच्याच जगात मनसोक्त बागडते. फुलपाखरांचे पंख घेऊन हळूहळू मोठी होते. कॉलेजात जायला लागली की, स्वतः बद्दल जास्तच जागरूक होते. आई बापाच्या घरी लाडात वाढलेली कळी सासरचा उंबरठा ओलांडून गृहप्रवेश करते तेव्हाच ती संसाराचे धागे विणायला घेते. घरदार, नातीगोती, नवरा, मुलं सगळ्यांचं करता करता स्वतः लाच विसरते. सगळ्यांनी पसारा करायचा आणि हिन एकटीन तो आवरायचा, सावरण्याच, आवरण्याच बाळकडू जणू आईच्या पोटातूनच शिकून येते.
आई म्हणून जगते, बायको म्हणून जगते, मुलगी बनते, बहीण बनते, प्रेयसी बनून साथ देते. सगळ्या आघाड्यांवर एकटीच धडपडत असते. प्रत्येकाच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांसाठी जगता जगता स्त्री म्हणून जगायलाच विसरते. पाण्याने कोणत्याही रंगाशी एकरूप व्हाव तशी पटकन रंगात रंगून जाते.
पण बाई ग तुझा रंग कोणता?
‘चूल आणि मूल’ इतकचं मर्यादित कार्यक्षेत्र न ठेवता घरच्या जबाबदार्या पेलून तू बाहेर पडतेस. ऑफिसमध्ये, नोकरीवर, दुकानात, कधी पोलिस, कधी उच्च पदस्थ अधिकारी तर कधी कंपनीची बॉस बनून सक्षमपणे उभी राहतेस. ऑफिसमधला रुबाब घरी आल्यावर घराच्या बाहेर ठेवतेस आणि पुन्हा घरच्या रंगात रंगून राबायला तयार होतेस. धावत्या लोकलमध्येही भाजी निवडतेस, लसूण सोलतेस, दुसर्या दिवशीची तयारी आजच करून ठेवतेस सगळीकडे तूच खपतेस. पण खरं खरं सांग, बाई ग तुझा रंग कसा?
इतकं सारं करूनही काही चूक झाली की सवाल जबाब तुलाच, आरोपीच्या पिंजर्यात तूच नेहमी उभी, सगळं खापर तुझ्याच माथी. खर खर सांग मग हीच का ग तुझी मायेची नाती?
इथं कुणीच कुणाचं नसतं. म्हणूनच आता दुसर्यांच्या रंगात रंगण सोडून दे. तुला आवडणारा, तुझ्या काळजाशी नाळ जोडणारा रंग शोध आणि बाई ग तुझ्याच रंगात तू आता थोड तरी रंगून बघ. सगळ्यांचं करता करता स्वतः चा रंग विसरून गेलीस तो जरा आठवून बघ. आता आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असशील पण जे करायचं राहून गेलं, जे जगायचं राहून गेलं ते आता तरी जगून बघ. मैत्रिणी जमवं, फिरायला जा, गप्पा मार, लिहिती हो, बोलती हो, घरामध्ये एखाद्या दिवशी छान गाणी नाचून त्याच्या तालावर छान डोलून बघ, तुझ्या हसण्यान घरातलं आभाळ पुन्हा एकदा भरून जाऊ दे. आनंदाच्या सरीत तुझ्या मनाला चिंब होऊ दे. स्वतःसाठी जग. सगळ्यांचे लाड केलेस आता जरा स्वतःचे लाड करून बघ.
तू कशीही असू दे, कुणी काही म्हणू दे पण तुझ्यासाठी तू खास आहेस हे लक्षात घे.
I am the best and unic
हा विचार मनात रुजव अन् स्वतः च्याच रंगात रंगायला तयार हो.
कुणी तुला मान देईल, कौतुक करेल, यासाठी महिला दिनाची वाट बघू नकोस. तुझा दिवस कोणता ते तूच ठरव. इथून पुढच्या आयुष्यात प्रत्येक दिवस तुझाच असेल यासाठी प्रयत्न कर. तुला खाली खेचणारे, त्रास देणारे हात भलेही तुझ्या जवळचे असतील, त्या त्रासाचा, त्या विरोधाचा सकारात्मक विचार कर. स्वतः ला त्रास करून न घेता, भावनांच्या जंजाळात न अडकता स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक अनुभवातून नवा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन खंबीरपणे उभी रहा. तुझा प्रत्येक दिवस ही विधात्याकडून तुला मिळालेला बोनस आहे, असं समजून तो आनंदात घालवं.
तुझं अस्तित्व काय हे कुणी दुसर्यांनी ठरवण्यापेक्षा तुझं तू ते ठरव. तुझं कर्तृत्व जितकं मोठं तितकं अस्तित्वही मोठं होऊ दे. दुसर्यांच्या पाऊलखुणा वरून कशाला चालायचं. तुझ्या अशा पाऊलखुणा या मातीत उमटू दे की तुझ्या नंतर हजारोंना त्या दिशेने जाण्याची प्रेरणा मिळेल.
तुझ्या आवडीचा रंग कोणता का असेना पण माझे बाय तो रंग तू अचूक निवड अन् मस्त त्या रंगात रंगून जा.
रंगात रंगूनी सार्या
रंग माझा वेगळा
मनी तुझ्या नित्य घडू दे
आनंदाचा सोहळा
शब्दांकन: सौ.आराधना गुरव वडूज
संकलन: प्रकाश राजेघाटगे, बुध
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |