सातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत पाटण, महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा कहर झाला. या पंचनामे सुरू असले तरी एकूण किती कोटींचे नुकसान झाले, याची आकडेवारी नेमकी नसलीतरी अंदाजे चारशे कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, ज्या भागात नुकसान झाले आहे तेथे युध्दपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या चारपाच दिवसांत हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यातील हुंबरळी, मिरगाव, आंबेघर, ढोकावळे त्याचबरोबर वाई तालुक्यातील जोर, देवरुखवाडी आणि जावळी तालुक्यातील रंेगडी अतिवृष्टी झाली यामध्ये १६७ गावे पूर्णत: तर २४९ गावे अंशत: अश एकूण ४१६ गावे बाधित झाली. दरडी कोसळून तसेच भूस्खलनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही तिघेजण बेपत्ता आहेत. ३0४१ पशुधन मातीत गाडले गेल्याने ते मृत्युमुखी पडले आहेत. कराड, वाई, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि सातारा या सह तालुक्यातील ११ हजार ४५२ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले असून ४९ हजार १४९ लोक स्थलांतरित आहेत.
जिल्ह्यात ४५ लोक मृत झाले असून तीन अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यात पाटण तालुक्यातील एकजण तर वाई तालुुक्यातील दोघांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये वाई तालुक्यातील कांेढावळे येथील ३, जावळी तालुक्यातील रेंगडीवाडी २, रेंगडी २, वाटंबे १, मेढा येथील १ तसेच पाटण तालुक्यातील बोंद्री येथील १, जळव १, मंदू्रळकोळे १, आंबेघर तर्फ मरळी १३, काहीर १, रिसवड (ढोकावळे) ४, मिरगाव ११, हुंबरळी १ आणि सातारा तालुक्यातील कुस ब्रद्रूक १, कोंडवे १ त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एकाचा समावेश आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |