01:09pm | Aug 28, 2020 |
बुध: निढळ मधील जवानाने आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. मुलीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गावातील सात गरजू कुटुंबियांना दिला मतदतीचा हात. अशा अनोख्या पध्दतीने मुलीचा वाढदिवसा साजरा करणार्या जवानाचे निढळ परिसरातून कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निढळचे सुपुत्र सुरेश मारुती कदम (फौजी) देशाच्या सेवेसाठी सीमा सुरक्षा दलामध्ये सध्या ते दिल्ली येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. देशभर कोरोेेनाचा विळखा घट्ट होत असताना आपण आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस गरजु कुटुंबाना काही ना काही मदत करुन साजरा करावा असा निश्चय त्यांनी केला. त्यांची कन्या कु.आरोही हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गावातील सात गरजू कुटुंबाना किराणा किटस् देवुन वाढदिवस साजरा करुन सर्वांना एक आदर्श घालुन दिला आहे.
जवान सुरेश कदम सध्या कर्तव्यावरच आहेत परंतु गावात असलेल्या त्यांच्या मित्र परिवाराने हा कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडला. प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा परंतु या सर्व गोष्टींना बाजुला करत आपण सुध्दा समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना मनात ठेेवुन त्यांनी घालुन दिलेला आदर्श सर्वांसाठी अभिमानास्पद आहेे.
दरम्यान जवान सुरेश कदम यांनी अनोख्या पध्दतीने साजरा केलेला वाढदिवस सध्या परिसरातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. परिसरतील नागरिकांनी जवान कदम यांच्या सामाजिक़ बांधिलकीला आणि आरोही सुरेश कदम हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |