05:01pm | Jul 01, 2022 |
मुंबई : अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या भारताला खळखळून हसवणारं एक मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ हे इंडस्ट्रीमधल्या प्रत्येकाचे मामा आहेत आणि या मामांनी त्यांच्या आयुष्याची 75 वर्ष नुकतीच पूर्ण केली. वयाच्या अमृत महोत्सवासोबत आपल्या कारकिर्दीची सुद्धा 50 वर्ष मामांनी पूर्ण केली आणि त्याच साठी एक जंगी सेलिब्रेशन म्हणून अशोक मामांच्या दैदीपम्यान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन झी मराठीवर करण्यात आलं आहे.
अशोक मामांनी 4 जून रोजी आपल्या वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केली. त्याच दिवशी निवेदिता सराफ यांनी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करत अशोक मामांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकाचंअनावरण सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे. 'बहुरंगी अशोक' असं या कार्यक्रमाचं नाव असून मराठीतील अनेक कलाकार येऊन मामांच्या यशस्वी करिअरमधल्या खास आठवणी, काही कडक परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
यासंबंधी झी मराठीच्या सोशल मीडियावर सध्या दमदार प्रमोशन होताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकरांना अशोक मामांच्या काही गाजलेल्या भूमिकांच्या क्लिप्स दाखवत त्यांना त्या भूमिकेचं आणि चित्रपटाचं नाव ओळखायचं असं चॅलेंज दिल्याचं अनेक विडिओ मध्ये दिसत आहे. माझा पती करोडपती चित्रपटातील कॅप्टन बाजीराव रणगाडे, सुपरहिट अशी ही बनवाबनवी चित्रपटातला धनंजय माने, नवरा माझा नवसाचा मधील कंडक्टर लालू, गंमत जम्मत मधील फाल्गुन, एक डाव धोबीपछाड मधील दादा दांडगे, बुटाचा भाऊ मधील बंडू अशी एकाहून एक अफलातून पात्र अशोक मामांनी अमर केली आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |