08:11pm | Jan 08, 2023 |
सातारा : चाटे शिक्षण समूह कराडच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन कराड या ठिकाणी ‘संकल्प यशाचा? वेध उज्वल भवितव्याचा’ या कार्यकमाचे आयोजन इ. 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने करण्यात आले होते. कार्यकमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली.
प्रारंभी पालक प्रतिनिधी डॉ. शेखर कुंभार यांनी मनोगतात विद्यार्थी- पालक सुसंवाद का महत्वाचा आहे व त्याचा यशाशी असणारा संबध स्पष्ट केला. चाटे समूहाच्या सहवासामुळे आपल्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य घडवताना योग्य दिशा मिळाली, असे त्यांनी सांगितले. कराडचे शाखा व्यवस्थापक रमेश बनकर यांनीही मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन केले. अर्बन बॅकेचे सी. ई. ओ. सीए दिलीप गुरव यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व व पालकांचा आदर याविषयी मार्गदर्शन केले. कोल्हापूर विभागाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना चाटे शिक्षण समूह एक कुटूंब आहे. नियम व शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणारी संस्था म्हणून तिची ओळख आहे, असे सांगून ते म्हणाले, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे, ते ज्याला मिळते तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परिपूर्ण ज्ञानाजर्नासाठी विद्यार्थांनी शिस्तीचे पालन, नियोजनाची कास धरावी. यशस्वीतेसाठी स्वत:प्रति आत्मविश्वास, कठोर परिश्रम व वाचन, लेखन, मनन व चिंतन ही चतु:सुत्री समोर ठेवून काळ, काम, वेळ यांचे गणित योग्य रीतीने जुळवणे तितकेच महत्त्वाचे. अभ्यास करताना आलेले अनुभव हा गुरू मानून चाला. नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थी मित्रांना दिला.
कार्यकमाचे प्रमुख मार्गदर्शक चाटे शिक्षण समहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात चाटे शिक्षण समूहाबद्दल बोलताना ते म्हणाले, चाटे शिक्षण समूह ही संस्था समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेवून त्यानुसार काम करणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ज्या समस्यांना सामोरे जायचे आहे त्या प्रथमत: समजून घ्याव्यात. समाजात तुम्हाला स्वतःचे स्थान निर्माण करावयाचे असेल तर आपले ज्ञान व बुद्धीमत्ता सिद्ध करावी लागेल. मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारीक जीवनात यथायोग्य वापर करावा लागेल. ज्ञानात एवढी ताकत आहे की तुम्ही जग जिंकू शकता, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दूल कलाम, महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वातून आपणास पहावयास मिळते. विद्यार्थ्यांनी नुसती स्वप्न न पाहता ती सत्यात उतरवण्यासाठी पूर्ण यश मिळेपर्यंत अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करत असताना नाउमेद होवू नका. अभ्यास केवळ परीक्षेसाठीचा नको, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वत:ला या स्पर्धेच्या युगात पुर्णत: सिद्ध करण्यासाठी मनापासून अभ्यास करा.
शेवटी पालकांना पालकत्वाच्या भूमिकेविषयी जाणीव करून देताना आपली मुलं जोपर्यंत सक्षमपणे घडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पाल्याचे केवळ संगोपन हीच जबाबदारी गृहीत न धरता त्यांना गरजेनुसार प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांच्या वाईट सवयीबाबत दक्ष राहावे. मोबाईलचा अवाजवी वापर, टीव्ही साठीचा अधिक वेळ, संगती यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, याची जाणीव पाल्यास करून द्या.
कार्यकमाचे प्रास्ताविक करताना चाटे शिक्षण समूह कराडचे व्यवस्थापक प्रा. रमेश बनकर यांनी कार्यकमाचा हेतू स्पष्ट करताना कराड शाखेच्या गेल्या बावीस वर्षातील दैदिप्यमान कारकीर्दिचा आढावा घेवून चाटे शिक्षण समूहाने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाला दिलेल्या डॉक्टर्स, इंजिनिअर्स याबाबत सकारात्मक माहिती दिली.
कार्यकमात चाटे शिक्षण समूहाचे माजी विशेष गुणवंत विद्यार्थी डॉ. योगेश जाधव,डॉ. शैलेश पाटील,डॉ. विहापूरे, अभियंता तुषार खराडे व अमित आदमाने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इ. 11 वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकमास चाटे शिक्षण समूह कराड मधील सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सर्जेराव राऊत यांनी केले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |