08:46pm | Dec 27, 2022 |
कराड : कोकणात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ टँकर-मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लालासो खाशाबा शेवाळे असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
रत्नागिरी येथे कामाला असलेले लालासो खाशाबा शेवाळे (५८) हे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. रत्नागिरी येथे कामाला असलेले शेवाळे सुट्टी संपवून हजर होण्यासाठी आपल्या ऑफिसकडे येत होते. याचवेळी एका वळणावर घात झाला आणि एका क्षणात सगळेच होत्याच नव्हतं झालं. ते शासकीय सेवेत कामाला होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेवाळे हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवडे येथील रहिवासी आहेत.
या मार्गावरील टँकर रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तर मोटारसायकलस्वार कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. याचवेळी साखरपा जवळील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने अपघातग्रस्ताला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने आणण्यात आले.
अपघाताचे वृत्त कळताच साखरपा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या पाटील, हवालदार किरण देसाई, सागर उगले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्ताला आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |