03:57pm | Oct 18, 2021 |
सातारा (जिमाका) : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण दरम्यान राहण्याची, जेवणाची, प्रवासभाडेची सोय कंपनी मार्फत मोफत केली जाणार आहे. उमेदवारांना गणवेश, सेफ्टीबुट, सुरक्षा साधने दिली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारास प्रमाणपत्र दिले जाणार असून कंपनी मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, विजबिल, आधारकार्ड, फोटो व बँक पासबूक च्या तीन प्रतीसह दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य एस. एम. धुमाळ यांनी केले आहे. अधिक माहिती साठी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधावा.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |