12:26pm | Jul 10, 2020 |
पुसेगाव: कृषि उत्पादन तंत्रज्ञानामध्ये योग्य वाणांची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाण्याच्या सुयोग्य वापराबरोबर पेरणी सोबत बिजप्रक्रीया करणे आवश्यक व महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मंडल कृषि अधिकारी सचिन लोंढे यांनी कृषि संजीवनी सप्ताहाच्यावेळी व कृषि दिनाचे औचित्य साधून निढळ येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह दि.1 जुलै ते दि. 7 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कृषि दिनाचे औचित्य साधून गावचे सरपंच दादासाहेब निर्मळ यांच्या हस्ते (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सचिन लोंढे म्हणाले की, खरीपामध्ये सोयाबिन व घेवडयासारख्या पिकांची बिज प्रक्रीया करुण पेरणी केल्यास उगवण क्षमता व उत्पादनात वाढ होते. यावेळी कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी (कै.) वसंतराव नाईक यांचा जीवनपट व त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर निढळ येथील शेतकरी नंदकुमार देशपांडे यांचे क्षेत्रावर बांधावरील फळबाग लागवड कृषि पर्यवेक्षक नामदेव कोळेकर व सचिन लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषि विभागाच्या बांधावरील फळबाग लागवड, नाडेप व गांढूळ खतनिर्मिती युनिट उभारणी करावी, असे आवाहन सचिन लोंढे यांनी याप्रसंगी केले. गावचे सुपुत्र माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थितांना गावचा विकास व शेतीचे उत्पन्न वाढविणे याविषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे कृषि सहाय्यक निलेश किरतकुडवे व नवनाथ खुस्पे, प्रकाश निकम, अशोक खुस्पे यांनी परिश्रम घेतले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |