02:09pm | Apr 24, 2021 |
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलनाचे संकट ओढवले आहे. या हिमस्खलनामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 384 जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. 23 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच यात सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरु होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवरून अलर्ट जारी केला होता. तसेच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं होतं. आज मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी करुन अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर बचावकार्याला अजून वेग आला. आज मी हवाई पाहणी केली आहे. बचावकार्य सुरु आहे. मात्र रस्ता अजूनही बंद आहे.’, असं मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं.
यापूर्वी 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडे दहा वाजता चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये ग्लॅशियर तुटून ऋषिगंगा नदीत पडला होता. या दुर्घटनेत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर काही जण बेपत्ता झाले होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |