01:34pm | Jul 04, 2022 |
सातारा : वाई शहरातील रहिवासी असलेला अर्जुन मोहन यादव (वय 25) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून दि. 2 रोजी खून केला होता. या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली होती. या खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते. अज्ञातांकडून हा गोळीबार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान सातारा पोलिसांसमोर होते. मात्र, सातारा एलसीबीच्या पथकाने पुणे परिसरात केलेल्या धडाकेबाज छापेमारीत वाईच्या खून प्रकरणातील 3 अल्पवयीन फरार असलेला संशयित आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेतल्याने सातारा एलसीबीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई शहरातील रहिवासी असलेला अर्जुन मोहन यादव याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून दि. 2 रोजी खुन केला होता. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, शरद बेबले, पोलीस नाईक नाईक फडतरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहीत निकम, प्रमोद सावंत यांच्या पथकाला आरोपी शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
या पथकाने सातारा जिल्ह्यातील भुईंज कोरेगाव पुसेगाव या ठिकाणी या धाडी टाकल्या होत्या. पण त्या ठिकाणी काहीच न सापडल्याने या पथकाने तपासाची दिशा बदलून मोर्चा पुण्याच्या दिशेने वळवला. पुणे येथे टाकलेल्या धाडीत 3 अल्पवयीन आरोपींना गजाआड करण्यात या पथकाला अखेर यश आले आहे इतर 2 आरोपींना लवकरच गजाआड करणार असलेचा विश्वास या पथकाने व्यक्त केला आहे.
सातारा येथील बॉम्बे रेस्टारॅट चौक परिसरातील नटराज मंदीरातुन देव दर्शन करुन बाहेर आल्यावर त्या ठिकाणी दुचाकी वरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात पिस्तूलच्या साह्याने जवळुन दोन गोळ्या झाटल्याने अर्जुन यादव हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा हादरला होता. या गंभीर घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अजित बोऱ्हाडे एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व इतर पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून एलसीबीचे खास पथक तयार करुन आरोपींचा तातडीने शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु असून त्यानंतर त्यांनी हा खून का केला याचे कारण समोर येईल, असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |