कराड : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री म्हाळसाकांत विद्यामंदिर पाल, ता. कराड येथील कलाशिक्षक विजयकुमार पांडुरंग शिंगण यांना ओझर्डे, ता. वाई येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेमार्फत सातारा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरचे प्रशासन सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, माजी शिक्षण सभापती उत्तमराव माने संस्थेचे अध्यक्ष सुनील फरांदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या 15 वर्षाच्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामध्ये कला शिक्षक म्हणून केलेल्या कामाबरोबरच जगविख्यात शिव राज्याभिषेक रांगोळी साकारून त्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तसेच सामाजिक प्रश्न हाताळत रांगोळीच्या माध्यमातून त्यानी केलेले समाजप्रबोधन, दुष्काळग्रस्त व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेला निधी संकलित करून मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडे सुपूर्द करणे, त्याच बरोबर आपल्या कलेच्या जोरावर समाजातील विविध घटकांशी संपर्क साधून लोकवर्गणीतून विद्यालयाचे सुशोभीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न व कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी समाजामध्ये जणजागृती निर्माण केली व कोरोना हा आजार किती भयानक आहे. त्यासाठी जनजागृती करता रस्त्यावरती फलक लेखनाच्या माध्यमातून समाजजागृती केली.
गड संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून गडावरील विविध मोक्याच्या ठिकाणी चित्र रेखाटन व संदेश पर पोस्टर ची निर्मिती करून केलेले काम, त्याचबरोबर विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेली मदत याचा विचार करून या कलावंता चा सन्मान करण्यात आला व शिंगण यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिवा शुभांगीताई गावडे, सहसचिव प्रशासन डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव अर्थ सिताराम गवळी, आजीव सेवक श्रीराम साळुंखे, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य महेश गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य एस.आर. पाचुपते, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पाल व पाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |