01:58pm | Sep 27, 2021 |
करवीर : कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणार्या एकास पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
जमीर अरूण पटेल (वय-45, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उचगावजवळ (ता. करवीर) वाहन पकडून त्यातून तब्बल 21 लाख रुपये किमतीचा गुटखासाठा हस्तगत करण्यात आला. जमीर अरुण पटेल याला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातून गुटखा व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा होती. कर्नाटकातील संकेश्वर, निपाणी परिसरातून पुणे-बंगळूर महामार्गावरून पान मसाला व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली.
या माहितीनुसार सकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, वाहनाचा पाठलाग करत उचगावजवळ या वाहनास अडवण्यात आले. वाहनामध्ये 21 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या कारवाईमध्ये आकाश पाटील, मोहन गवळी आयुब शेख, दिगंबर सुतार, आदी पोलिस कर्मचार्यांचा सहभाग होता.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |