03:38pm | Jan 12, 2022 |
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा हद्दीमधील हॉटेल ब्राईटलँड रिसॉर्ट मिळकतीच्या मागील बाजूस असलेल्या क्षेत्रमहाबळेश्वर देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर इमारत बांधकामाबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सन २०१९ पासून पुराव्यानिशी तक्रार अर्ज व पाठपुरावा करून देखील आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र दरम्यानच्या काळात बेकायदेशीर इमारतीचं बांधकाम पूर्णत्वास गेले असल्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तत्कालीन गावकामगार तलाठी नाकिंदा यांनी अनाधिकृत बांधकामासंदर्भात केलेल्या पंचनाम्यात बांधकामास जबाबदार असलेल्या विजय जमनालाल सेवकरमाणी यांच्या घेतलेल्या जबाबात सर्वे नं. 2 / 10 असा उल्लेख केला आहे व त्याच्या आधारे तहसीलदार महाबळेश्वर यांनी सदर अनाधिकृत बांधकामाचा अहवाल दि. ३ मार्च २०२० रोजी प्रांताधिकारी वाई यांना पाठवलेला आहे. या अहवालात भल्या मोठ्या इमारत बांधकामास कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतली नसल्याचा स्पष्ठ उल्लेख केला आहे. असे असताना देखील त्या इमारतीचे तीन मजली बांधकाम पूर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
या अनाधिकृत बांधकामाचा गावकामगार तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात उल्लेख असलेल्या व विजय रमाणी यांनी जबाब दिलेल्या सर्वे नं 2/10 मिळकतीच्या सातबारा उताऱ्याच्या नकला तहसिलदारांकडे मागणी केली असता या सर्वे नं. च्या नकला तहसीलदार कार्यालयाच्या अभिलेख विभागात उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर सदर अनाधिकृत बांधकामाचे मुळ तक्रारदार सूर्यकांत पांचाळ यांना देण्यात आले. तसेच उत्तर गावकामगार तलाठ्यांनी देखील पांचाळ यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. प्राप्त उत्तरावरुन हॉटेल ब्राईटलँड रिसॉटच्या मागील बाजूस सुरू असलेलं बांधकाम हे सर्वे नं 2/10 चा सातबारा अस्तित्वातचं नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदरचे एवढे मोठे टोलेजंग बांधकाम कोणाच्या व कोणत्या मिळकतीमध्ये केले. याच्या सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून नगररचना, भूमिअभिलेख तसेच प्रांताधिकाऱ्यांमार्फत समिती गठीत करुन या प्रकरणाची सत्यता लवकरात लवकर जनतेसमोर आणावी, अशी मागणी सूर्यकांत पांचाळ यांनी केली आहे.
तसेच या अनाधिकृत बांधकामाची माहिती स्थानिक महसूल प्रशासनाला आहे का? की मुद्दामहून प्रशासन धनदांडग्या व्यक्तीसाठी डोळे झाक करुन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करुन फसवणूक तर करीत नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
त्यामुळे या प्रकरणातील तत्कालीन गावकामगार तलाठ्यांनी केलेला पंचनामा व विजय रमाणी यांनी जबाब दिलेल्या सर्वे नं. 2/10 हा सरळसरळ दिशाभूल व फसवणूक करणारा आहे व अनाधिकृत बांधकामास संगनमताने संरक्षण व पाठबळ देणारा असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे सदरची बाब ही पूर्णपणे बेकायदेशीर व गंभीर स्वरूपाची दखल पात्र असल्याची दिसत आहे.
अनाधिकृत इमारत बांधकामाचा पंचनामा करणारा तलाठी व जबाब देणारा रमाणी यांच्यावर व अनाधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी हे कायदेशीर कारवाई करून प्रशासनामध्ये आदर्श निर्माण करणार का पाठिशी घालणार? हे पाहणे जनतेसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाकिंदा येथील अनधिकृत बांधकामासंदर्भात मागील दोन वर्षापासून शासनस्तरावर पुराव्यानिशी पत्रव्यवहार करून व पाठपुरावा करून देखील व जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रांताधिकारी कार्यालय यांनी वेळोवेळी चौकशी कार्यवाहीसाठी पाठवलेल्या पत्र व्यवहाराची तहसीलदार कार्यालय महाबळेश्वरकडून गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे सदरचे टोलेजंग अनधिकृत बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सदर अनाधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व बांधकाम करुन घेणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून सदरच्या इमारतीस टाळे ठोकून अनाधकृत बांधकाम पाडण्या संदर्भात जिल्हाधिकारी स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी सूर्यकांत मारुती पांचाळ यांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |