सातारा : आज सकाळी कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातून कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या चारजणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आज रात्री उशिरा सहाजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, मंगळवारी पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 300 अनुमानितांचा अहवाल अद्याप रुग्णालयीन प्रशासनास प्राप्त न झाल्याने हा आकडा मोठा असू शकतो, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचा स्ट्राईक रेट जास्त आहे. पुणे-मुंबई व देशातील इतर राज्यांतून विस्थांपितांचे लोंढे धडकूनही सातारा जिल्ह्याने कोरोना संसर्गाला थोपवून धरले आहे. आज सकाळी कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातून चारजणांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज रात्री उशिरा कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक, नवा रस्ता पाटण येथील 12 वर्षीय सारी रुग्ण मुलगा, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, सदु वरपेवाडी ता. पाटण येथील 30 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील मुंबई येथून आलेली 29 वर्षीय महिला तर पाटण तालुक्यातील सदु वरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
240 जणांच्या स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 41, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 81, वेणताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 69, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 11 असे एकूण 240 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
16 हजार 107 परप्रांतीयांची जिल्ह्यातून पाठवणी
सातारा जिल्ह्यातील 16 हजार 107 परप्रांतीय मजुरांना 13 श्रमिक रेल्वे गाड्यांमधून त्यांच्या मुळ राज्यात सोडण्यात आले आहे. परप्रांतीय मजुरांना आपल्या स्वगृही जाता यावे यासाठी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सातारा रेल्वे स्टेशन येथून मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी 12 मे ते 25 मे अखेर श्रमिक रेल्वे व त्यामधून गेलेल्या मजुरांची संख्या पुढीलप्रमाणे. मध्यप्रादेश 1 रेल्वे-मजूर संख्या 1305, राजस्थान रेलवे- 1 मजूर संख्या 873, उत्तरप्रदेश 7 रेल्वे- 8993 मजुर संख्या, छत्तीसगड 1 रेल्वे-मजुर संख्या 1012, बिहार 2 रेल्वे मजुर संख्या 2722 आणि झारखंड 1 रेल्वे आणि 1200 मजुर असे एकूण 16 हजार 107 परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे. या कामी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नोडल ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांची नियुक्ती केली होती. त्यांच्याबरोबर उप वनसंरक्षक धर्मवीर साल्वीथल आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |