11:41am | Dec 10, 2021 |
अमेरिका : लॉस एंजलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस एशिया यूएसएमध्ये मुंबईच्या राधिका राणे-भोसले हिने बाजी मारत ‘मिसेस एशिया यूएसए फर्स्ट रनरअप’ पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमेरिकेत वर्जेलिया प्रोडक्शन्सद्वारे प्रतिष्ठत मिसेस एशिया यूएसए स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खास विवाहित महिलांसाठी ही सौंदर्यस्पर्धा असते. या स्पर्धेत जिंकलेल्या मुकुटाचा मान राखत जागतिक स्तरावर मुलींच्या शिक्षणाला सहाय्य करण्याचा प्रयत्न राधिका करणार आहेत. या विषयासंबंधी जनजागृती करण्याच्या विचारासह स्पर्धेत राधिका हिच्या समृद्ध हिंदुस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेहरावाने लक्ष वेधले. या स्पर्धेत राधिकाने केलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील प्रेरित पेहरावाला उपस्थितांची विशेष पसंती मिळाली. एका सशक्त हिंदुस्थानी स्त्रिचे दर्शन राधिकाने या वेळी घडविले.
आशियाई देशांतून सर्वोच्च 48 इच्छुक व्यक्तींची निवड स्पर्धेकरिता करण्यात आली होती. त्याकरिता या व्यक्तींनी समाजसेवा, नॅशनल गाऊन कॉम्पिटिशन, नृत्य आणि इविनिंग गाऊन कॉम्पिटिशनच्या आधारे गुणांकन देण्यात आले होते.
राधिकाचे बालपण मुंबईत गेले. 2015 पासून ती पती अमर समवेत सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षीय लेकीची आई असलेली राधिका अमेरिकेत टेक्नोलॉजी स्टार्टअप एसजीएस टेलिकॉम, इंकच्या उपाध्यक्ष आहे. तिने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केले आहे. आपले करीअर आणि कुटुंब सांभाळून राधिका अमेरिकेतील काही ब्रँडकरिता मॉडेलिंग करत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |