02:16pm | Feb 16, 2021 |
चेन्नई: पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या टिम इंडियाने दुसर्या कसोटीत दमदार कामगिरी करत इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा आर.आश्विनच या सामन्याचा हिरो ठरला.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 227 धावांनी पराभव केला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्याच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर 429 धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त 7 विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांवर संपुष्ठात आला. अश्विनने पहिल्या डावात पाच, दुसर्या डावात 3 विकेट आणि शतकासह त्याने विजयाच महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर अक्षर पटेलने पदार्पणात पाच विकेट घेतल्या.
चौथ्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज होती आणि भारताला फक्त 7 विकेट हव्या होत्या. गोलंदाजांसाठी अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी पाहूण्या इंग्लंड संघाला फिरकीची कमाल दाखवून दिली. इंग्लंडने कालच्या 3 बाद 54 धावसंख्यवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली.
संपूर्ण सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीवर नाचवणार्या अश्विनने चौथ्या दिवशी पहिला धक्का दिला. त्याने लॉरेन्सला 26 वर बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्सला 8 धावांवर बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. स्टोक्सला बाद करण्याची अश्विनची ही 10वी वेळ ठरली आहे. तो बाद झाले तेव्हा इंग्लंडची अवस्था 5 बाद 90 अशी होती.
स्टोक्सच्या जागी आलेल्या ओली पोपला अक्षरने 8 धावांवर माघारी पाठवले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी कुलदीप यादवने बेन फोक्सला बाद करून इंग्लंडला सातवा धक्का दिला. यादवची या सामन्यातील पहिली विकेट ठरली. दुसर्या सत्राच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरने कर्णधार जो रूटला बाद करून भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रूटने 33 धावा केल्या. रुटने गेल्या तीन कसोटीत सलग तीन शतक केली होती. ज्यात दोन द्विशतकाचा समावेश होता.
भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्माने धमाकेदार 161 धावा केल्या होत्या. ज्यामुळे संघाला 329 धावांपर्यंत मजल मारता आली. यात अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी योगदान दिले होते. इंग्लंडचा पहिला डाव फक्त 134 धावांवर संपुष्ठात आल्या. त्यांच्याकडून बेन फोक्सने सर्वाधिक 42 धावा केल्या. अश्विने पाच फलंदाज बाद केले. भारताच्या दुसर्या डावात अश्विनने शतकी खेळी केली. तर कर्णधार विराटने अर्धशतक केले.
मौजे सासकलचे ग्रामसेवक अंगराज जाधव यांच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थ नाराज |
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |

बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |