03:13pm | Nov 30, 2020 |
सातारा: विरोधकांना त्यांच्या तुंबड्या भरायच्या आहेत. म्हणूनच त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले आहे. आयुक्त धर्मादाय पुणे येथे आजही शिवाजीराव पाटील यांचे नाव असलेने तो आमचा संघ असून विरोधकांनी कोल्हेकुई थांबवावी अन्यथा योग्य ठिकाणी योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नोंदणी स्व. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनीच मा.आयुक्त धर्मादाय पुणे येथे केली आहे. आजही या कार्यालयात त्यांचेच नाव आहे. इतर कोणाच्याही नावाची अद्याप नोंद झालेली नाही. त्यामुळे हा संघ निर्विवादपणे शिवाजीराव पाटील यांच्याच गटाचा आहे. सन 2008 मध्ये या संघामध्ये फूट पडली. संघाच्या नावाचे लेटरपॅड दोन्ही गट वापरु लागले. परंतु संघ कोणाचा म्हणून आयुक्त धर्मादाय पुणे यांच्या कोर्टमध्ये दोन्ही गटाकडून दावे दाखल करणेत आले आणि वाद सुरु झाला.
आयुक्त, धर्मादाय पुणे यांनी सन 2016 ला शासनाचा प्रतिनिधी घेवून शिक्षक संघाच्या सभासदामधून निवडणूक घेवून राज्य कार्यकार्यरिणी निवडणेत यावी असा निकाल दिला. हा निकाल माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाने मान्य केला व लोकशाही पद्धतीने कार्यकारिणी करणेस मान्यता दिली.
परंतु विरोधकांना लोकशाही पध्दतीने कार्यकारिणी करणेचे मान्य नसलेने त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपिल केले. त्यांना हुकूमशाही पद्धतीने कार्यकारीणी निवडून आपल्या तुंबड्या भरायच्या होत्या. त्यांचे खाणे-पिणे त्यावर अवलंबून होते. म्हणून त्यांनी या निकालाला विरोध केला. आजही पुणे कोर्टातील वाद प्रलंबित आहे. म्हणून आयुक्त धर्मादाय पुणे येथे आजही शिवाजीराव पाटील यांचे नाव असलेने तो आमचा संघ आहे. त्यामुळे आम्ही त्याचा वापर करीत आहे व करणार आहोत.
कोणीही कोणत्याही वल्गना करू देत त्यांना आम्ही इथून मागेही भीक घातली नाही आणि इथून पुढे ही घालणार नाही. यांना शिक्षक संघ आपणांस मिळणार नाही म्हणून यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राज्य शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ या वेगवेगळ्या नावांनी संघटनेची रजिस्ट्रेशन केलेली आहेत. यावरुन त्यांची भ्याड प्रवृतीची लक्षणे दिसून येतात. जर त्यांनी आमच्या विरोधातील कोल्हेकुई थांबवली नाही तर योग्य ठिकाणी कारवाई दाखल केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने |
महाराष्ट्र किसान मंच शेतकरी संघटनेतर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार |
ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी ऐवजी आता 29 जानेवारीला होणार : पालकमंत्री |
भाजपने मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती : आ. शशिकांत शिंदे |
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करा |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |