01:21pm | May 23, 2020 |
मुंबई: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. सोशल मीडियावरून महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून अशा पोस्ट टाकणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणार्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
टिकटॉकवर अॅसिड अटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले. त्याचीही गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत 410 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 213 जणांना अटक करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि अफवा पसरविणार्या पोस्ट टाकू नका. तुमच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |