04:12pm | Sep 15, 2021 |
सातारा : जागेसह घरकूलासाठी आंदोलन उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना पारधी समाजातील नागरिक, महिला. आकाशाच्या छताखाली ऊन, वारा, पावसात पाले टाकून राहणाऱ्या पारधी समाजासाठी शासनाची जागेसह घरकूल योजना असून देखील प्रशासनाकडून कार्यवाही होत, नसल्याच्या निषेधार्थ लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंदोलकांना गुरुवार दि. 15 रोजी तातडीची बैठक घेवून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने, या आंदोलनाबाबत उद्या निर्णय घेवू, असे उमेश चव्हाण यांनी सांगितले. तर सातारा जिल्हय़ातील पारधी समाजाला शासकीय जागा मिळण्यासाठी आ.शशिकांत शिंदे यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्न केल्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी जागृत्ती कुमरे यांनी जिल्हय़ातील पारधी समाजाला जागा व घरकुले देण्याबाबत सातारा जिल्हा प्रशासन विभागाशी संपर्क साधून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात येईल असे कळवले आहे.
पारधी समाजाला जागेसह घरकूल देण्याचा अहवाल तयार करण्यासाठी आ.शशिकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे सातारा जिल्हय़ातील 11 तालुक्यांसाठी चार अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याचे लेखी पत्रही आ.शिंदे यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आ.शशिकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उमेश चव्हाण यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
दरम्यान, बुधवारी आंदोलन सुरु केले असले तरी पारधी समाजाच्या घरकूल व जागेसाठी सकारात्मक पर्याय समोर आले आहेत. मात्र, जागेसह घरकूल योजना तातडीने सुरु कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचे उमेश चव्हाण यांनी प्रशासनाला सांगितले असून, त्या अनुषंगाने आज होणाऱया बैठकीकडे तमाम पारधी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
या आंदोलनात भाईज्या भोसले, नम्या भोसले, यंत्र्या भोसले, डिया भोसले, पितांबर भोसले, विजय शिंदे, रोहित शिंदे, खुदा भोसले, अमर भोसले, रोणिका भोसले, राजा भोसले, रोहित शिंदे, मुक्या पवार, राजा भोसले, अबदेश भोसले, माकेश भोसले, आकाताई भोसले, तोगरी भोसले व पारधी समाजातील नागरिक उपस्थित होते.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |