11:39am | Dec 01, 2021 |
फलटण : सातारा जिल्ह्यातील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांची विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहे. यामध्ये बापू संभाजी निकम (वय 38,रा.शेरेचीवाडी(हिं)) असे खून झालेल्या शेतमजूराचे नाव आहे.
याबाबतची लोणंद पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सालपे गावाच्या हद्दीमधील एस.टी.बसथांब्याजवळ बापू निकम हे काही कामानिमित्त थांबले होते. दरम्यान, त्याठिकाणी किरकोळ कारणावरुन बापू निकम यांचे व सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे ता.फलटण) या भावांबरोबर वादावादी झाली. सौरभ जगताप, गौरव जगताप यांनी बापू निकम यांना रागातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये बापू निकम यांच्या वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी होत ते जागीच ठार झाले. यावेळी घटनास्थळावरुन सौरभ जगताप व गौरव जगताप या बंधूंनी पलायन केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणंद पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी व लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस अंमलदार महेश संपकाळ, लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी मृत बापू निकम यांचा मृतदेह शवविच्छेदन लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |