10:38pm | Sep 28, 2022 |
सातारा : म्हसवड, ता. माण येथील सोनाराला लुटलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि. २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २७ जुलै २०२२ रोजी ५.२० वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथील सोनार दुचाकीवरून कासारवाडी, ता. माण गावच्या हद्दीतून म्हसवड ते माळशिरस रस्त्याने जात असताना म्हसवड येथील श्री फार्म हाऊसच्या जवळ दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन सोनाराच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर सोनाराला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या जवळील १५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक गठीत केले होते. पथकाने सातारा व सोलापूर जिल्ह्यात जाऊन गोपनीय माहिती प्राप्त केली. त्याचप्रमाणे फिर्यादी सोनार ये-जा करणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान हा गुन्हा म्हसवड मधील एका सोनाराने त्याच्या साथीदारामार्फत केला असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता म्हसवडमधील संबंधित सोनाराने त्याच्या माळशिरस, जि. सोलापूर तसेच धुळदेव आणि म्हासाळवाडी, ता. माण येथील साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. खात्रीशीर माहिती मिळताच दि. २१ सप्टेंबर रोजी दूर्वा उर्फ दुर्योधन नाना कोळेकर वय ४०, रणजीत भाऊ कोळेकर वय २० दोघेही रा. धुळदेव, ता. माण, योगेश तुकाराम बरडे वय ३५, रा. पिलीव रोड, बरडेवस्ती, माळशिरस, ता. माळशिरस, रामदास विठ्ठल गोरे वय २० रा. म्हासाळवाडी, ता. माण या चार जणांना माळशिरस, सोलापूर, म्हसवड या विविध ठिकाणांवरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १४ लाख ५८ हजार २३० रुपये किमतीचे सोने, गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कार, दुचाकी, नकली पिस्तूल व चाकू असा एकूण १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौघांनाही अटक करून म्हसवड येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या कारवाईत पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाने आदींनी सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |