02:33pm | Sep 10, 2021 |
सातारा: कोरोना महामारी असो वा अतिवृष्टी असो. अगदी पुनर्वसनाचे प्रश्न असोत त्यावेळी शशिकांत वाईकर आणि मंडळी कुठे होते? परळी भागात त्यांनी आजवर कोणते सामाजिक कार्य केले आहे? केवळ टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नाही. अशा ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे याचा विचार पक्षाने करावा, असे मत सातारा पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, ठेकेदार असलेल्या शशिकांत वाईकर आणि मंडळींनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाचे नव्हे तर, संधीसाधू राजकारण केले आहे. ज्यांनी आजवर परळी भागाच्या विकासासाठी एक दमडीही खर्च केली नाही, परळी भागातील लोकांच्यासाठी कुठेही कधीही उभे राहिले नाही. कोरोना, अतिवृष्टी, पुनर्वसन आदी कोणत्याही सामाजिक प्रश्नावर कवडीचेही काम केले नाही अशा मंडळींनी केवळ टेंडर मिळण्याच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावेळी परळी भागातील लोक कोरोना, अतिवृष्टी आदी समस्यांनी त्रस्त होते, त्यावेळी हि मंडळी कुठे होती, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पूर्वी उमेदवारी मिळाली नाही पण आता मिळावी या राजकीय महत्वकांक्षेपोटी आणि त्यातून टेंडर मिळावीत या स्वार्थी हेतूने वाईकर आणि मंडळींचा खटाटोप सुरु आहे. अशा स्वार्थी लोकांना परळी भाग कधीही थारा देणार नाही. त्यामुळे अशा लोकांना पक्षात का घ्यायचं याचा पक्षाने गांभीर्याने विचार करावा, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |