08:34pm | Jan 14, 2022 |
कराड : स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, शाळा, मार्केट, स्वच्छ सोसायटी आदींचे मूल्यांकन व गुण प्रदान करून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये स्वच्छ हॉटेल स्पर्धेमध्ये अलंकार हॉटेलला प्रथम क्रमांक पटकावला असून सुर्याज हॉटेलला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर तृतीय क्रमांक भाग्यश्री हॉटेलला मिळाला आहे. तसेच स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेत श्रीरत्न हॉस्पिटलने प्रथम क्रमांक, कोळेकर हॉस्पिटलने द्वितीय क्रमांक, तर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धेमध्ये कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक, शहर पोलीस ठाणे द्वितीय क्रमांक, तर पोस्ट ऑफिसला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
तसेच स्वच्छ मार्केट स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी मार्केटला प्रथम क्रमांक मिळाला असून छत्रपती संभाजी मार्केट द्वितीय, तर महात्मा गांधी मच्छी मार्केटला कराड द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच स्वच्छ सोसायटी स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी हाउसिंग सोसायटी प्रथम, स्वराज्य हाउसिंग सोसायटी द्वितीय, तर प्रकाश नगर हाउसिंग सोसायटीला तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर स्वच्छ शाळा प्राथमिक स्पर्धेत एस.एम.एस इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम क्रमांक, कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 द्वितीय, तर काशिनाथ नारायण पालकर हायस्कूलला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ शाळा माध्यमिक स्पर्धेत यशवंत हायस्कूल प्रथम, विठामाता हायस्कूल द्वितीय, तर कन्या प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
याचबरोबर कराड नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेमध्ये नागरिकांसह विविध संस्थांचाही लोकसहभाग वाढवा, यासाठी शॉर्ट फिल्म, पथनाट्य, पोस्टर चित्र, जिंगल स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा आदीं. स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी माझी स्वच्छ व सुंदर कृष्णा-कोयना, हरित कराड, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, माझे कराड; माझी जबाबदारी, कचरा विलगीकरणाचे महत्त्व आदि. विषय देण्यात आले होते. त्याचे मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण करून निकाल जाहीर करण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये बक्षीस, त्याचप्रमाणे ट्रॉफी व प्रमाणपत्रही देण्यात आले. यामध्ये पथनाट्य स्पर्धेत स्वरा ग्रुप प्रथम क्रमांक, एस.एम.एस. स्कूल द्वितीय क्रमांक, तर प्रीतिसंगम परिवाराला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच या स्पर्धेत सहभागी मुक्तांगण ग्रुप, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब ज्युनियर ग्रुप व सिटी हॉटेल मॅनेजमेंट ग्रुपला प्रमाणपत्र देण्यात आले.
जिंगल स्पर्धेत किशोर पवार प्रथम, सुनील वाडकर व आनंद कलबुर्गी यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर अस्मि चौगुलेला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत श्हागी शिप्रा कुलकर्णी, सुनील आचार्य, बाळ देवधर, आनंद अवसरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये संजीवनी इन्स्टिट्यूट प्रथम क्रमांक, MH प्रोडक्शन द्वितीय क्रमांक व ओमीज फिल्मला तृतीय क्रमांक मिळाला. यामध्ये सहभागी अभिनव फिल्म, काहीतरी नवीन प्रोडक्शनला प्रमाणपत्र देण्यात आले.
तर पोस्टर स्पर्धेमध्ये अनुराधा नवाळे प्रथम क्रमांक, पृथ्वीराज चौगुले द्वितीय व राहुल बिचकर याला तृतीय क्रमांक मिळाला. तर सहभागी गार्गी सूर्यवंशी, विना क्षत्रिय, अंशू सूर्यवंशी, श्रवण बेहेरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच भित्तीचित्र स्पर्धेमध्ये किरण कुंभार प्रथम, ऋषिकेश उपळावीकर व चारु जोशी यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर श्रेयस हापसे व राहूल बिचकर यांनाही तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तसेच सहभागी प्रसाद वाघमारे, आदिती कलबुर्गी व उन्नती कलबुर्गी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
नगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत कराड शहरासाठी ब्रँड ॲम्बेसिडरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये मधुरा किरपेकर, पद्मनाभ गायकवाड, डॉ. शंतनू कुलकर्णी, चंपा कांबळे यांचा सहभाग असून त्यांचा मान्यवरांकडून ऑनलाइन पद्धतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड शहरवासियांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेले व आपापल्या विषयात तज्ञ जालिंदर काशीद, रमेश ओझा, जुगलकिशोर ओझा, प्रबोध पुरोहित, महेश कुंभार, रमेश कदम या परीक्षकांचाही ऑनलाईन पद्धतीने सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
दरम्यान, नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचेही यावेळी सत्कार करण्यात आले. त्यामध्ये फीडबॅक टीम प्रदीप कोळेकर, युवराज शिंदे, प्रज्वल शिंदे, मिलिंद बामणे, प्रज्वल शिंदे, ओमकार भोकरे, विक्रम तुळसंकर, पंकज काटरे, हेमंत करोसे, आकाश कांबळे, प्रसाद जाधव यांचा समावेश होता. तर नगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आसिफ आर्ट अमित इनामदार, वसंत फोटो स्टुडिओ वैभव पाटील, दत्तात्रय भस्मे, सुनील पाटील, शशिकांत हापसे, महेश महादर यांचा समावेश होता. तर सी.एस.आर लीड अंतर्गत नगरपालिकेस सहकार्य करणाऱ्या संस्था, तसेच बँकांचाही सत्कार करण्यात आला. त्यांनाही सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. त्यामध्ये सिटी कॉम्प्युटरचे मंजीत आत्तार व अल्ताफ भालदार, विदर्भ कोकण ग्रामीण बँक कराड यांच्यातर्फे मोहसीन शिरगुप्पे, बँक व्यवस्थापक, राज मेडिकल यांचा समावेश होता.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत ज्या स्वयंसेवी संस्थांनी आपले योगदान दिले व स्वच्छता अभियान राबवले, अशा संस्थांचाही चित्र व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये एन्व्हायरो नेचर क्लब कराड, रोटरी रोटरी क्लब कराड, कराड प्रीतिसंगम हास्य परिवार, विजय दिवस समारोह समिती कराड, लायन्स क्लब कराड, गब्बर ग्रुप कराड, समर्थ भारत परिवार ग्रुप कराड यांचा समावेश होता. जनजागृती टीमचे सत्कार करण्यात आले. त्यामध्ये दिपाली कदम, कल्याणी पवार, अफ्रीन दिवाण, मनिषा चव्हाण, अजिंक्य मोरे, रोहन सूर्यवंशी, रविराज दाभाडे यांचा समावेश होता. तसेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मदत करणाऱ्या महिला बचत गटांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये एकता स्वयंसहाय्यता महिला बचत गट, मुक्ताई स्वयंसहाय्यता महिला बचत गट, विघ्नहर्ता स्वयंसहायता महिला बचत गट, शाकंभरी स्वयंसहायता महिला बचत गट यांचा समावेश होता.
त्याचबरोबर आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अनिल वास्के, प्रदीप कोळेकर, शरद तडाखे, महेश कांबळे, राजश्री माने, जयश्री जाधव, आरती चावरे, उमेश चावरे, नीता सोळवंडे, सोनाबाई तिरमारे, प्रल्हाद कांबळे, राजेश कांबळे यांचा समावेश होता. तर ड्रेनेज विभागात उत्कृष्ट काम करणारे संदीप बाळकृष्ण माने, प्रशांत महादेव थोरावडे, विद्युत विभाग राजाराम कांबळे वायरमन, दत्तात्रय भस्मे यांचाही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. तर प्रशासकीय अधिकारी प्रणेश मोरे, आरोग्य विभागाचे अभियंता रफिक भालदार, जलनिस्सारण व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता ए.आर .पवार, विद्युत विभागाचे अभियंता रणजीत भोसले यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर ऑनलाइन उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष रोकडे व नवेद बागवान, स्वच्छ सर्वेक्षण कोऑर्डीनेटर, गणेश जाधव व्यवस्थापक, दिपाली रेपाळ व्यवस्थापक तथा समुपदेशक, अंजना कुंभार समुदाय संघटक, प्रमोद जगदाळे समुपदेशक यांनी कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन जालिंदर काशीद सर यांनी केले. आभार गीतांजली यादव यांनी मानले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |