04:56pm | Oct 03, 2020 |
कराडः डीवायएसपी सुरज गुरव यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करा, अशी मागणी करत संतत्प कराडकर रस्त्यांवर उतरले आहेत. डीवायएसपींच्या बदलीचा निषेध व्यक्त हजारो नागरिक रस्त्यांवर उतरल्याने घोषणांनी सारा परिसर दाणाणून सोडला. या मोर्चाद्वारे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.
कराडमध्ये गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे डीवायएसपी सुरज गुरव यांची राजकीय हेतूने तडकाफडकी झालेल्या बदलीचा कराडमध्ये सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला. डीवायएसपी गुरव यांनी कराडमध्ये पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची नागपूरला झालेली बदली हा त्यांच्यावर अन्याय आहे. तरी ही बदली त्वरीत रद्द करावी, या मागणीसाठी कराडकरांनी मोर्चा काढला.
कराडचे डीवायीएसपी यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. अचानक तडकाफडकी बदली केल्यामुळे कराडकर संतप्त झाले आहेत. हा बदली आदेश शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.
शासनाने सुरज गुरव यांची बदली रद्द न केल्यास आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. त्यावेळी निर्माण होणार्या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |