सातारा : सातारा जिल्ह्यात शहरात गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जयंतीमुळे साताऱ्यात उपवासाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
सातारा जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यावर निर्बंध आले होते. मात्र यंदा शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे यंदाच्या गणेश जयंतीला मोठा उत्साह दिसून येत आहे. गणेश जयंती बुधवार दिनांक 25 रोजी सातारा शहर ठिकाणी साजरी होत आहे. सातारा शहरातील पंचमुखी, खिंडीतील गणपती, ढोल्या गणपती, अजिंक्य गणेश, गारेचा गणपती, कृष्णा नगरचा सुविधा गणेश, कड्याचा गणपती अशा विविध गणपती मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरे सज्ज झाली असून सर्व गणेश मंदिरांमध्ये गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच गणेश याग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील फुटका तलाव गणेश मंदिर गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने उजळून निघाले. विविध कार्यक्रमांचे येथे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. जन्मकाळ साजरा करण्यासाठी खिंडीच्या गणपतीसाठी सुद्धा मोठी तयारी सुरू आहे. पंचमुखी गणेशाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांच्या आदल्या दिवशी सुद्धा रांगा दिसून येत होत्या. गणेश जयंतीच्या मुहूर्तावर खिंडीच्या गणपती मंदिर परिसरात कुरणेश्वर देवस्थानच्या वतीने दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता जन्म काळ, दुपारी चार वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी साडेसात वाजता मोगरा फुलला मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम व 26 जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी नऊ ते बारा गणेश याग, साडेबारा ते तीन महाप्रसाद, साडेचार ते साडेपाच भजन आणि सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत भजन, आरती, छबिना आणि लळीताचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. ढोल्या गणपती मंदिरामध्ये बुधवारी गणेश आरती, जन्मकाळ, महाप्रसाद आणि भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचमुखी गणेश येथे सुद्धा सामूहिक आरती, अथर्वशीर्ष आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त साताऱ्याच्या फळबाजारात उपवासाच्या पदार्थांना आणि फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. साबुदाणा, राजगिरा, भगर याशिवाय तत्सम पदार्थांना सातारकरांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |