09:30pm | Nov 23, 2022 |
सातारा : वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाई असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ नोव्हेंबर रोजी १२.४५ ते दि. २३ नोव्हेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास वाई येथे डॉ. घोटावडेकर हॉस्पिटल, मधली आळी आणि शैलेंद्र देवकुळे यांच्या प्रसाद कंट्रक्शन येथील बंद फ्लॅटचे कुलूप अज्ञात चोरट्याने साहित्य चोरून नेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पेट्रोलिंग करून संशयित चोरट्याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. दरम्यान बाळासाहेब भरणे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिंदे हायस्कूल समोर या गुन्ह्यातील संशयित दुचाकीवरून जात असताना दिसला. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना पाहताच तो पळून जात असल्याचे लक्षात येताच त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख रुपयांचे हॉस्पिटलमधुन चोरलेले मशीन, व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत पोलीस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदस्कर, अमित गोळे यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |