01:15pm | Jul 05, 2020 |
सातारा : बनगरवाडी, ता. माण येथील एका शेतामध्ये सुमारे पावणे आठ लाख रुपये किंमतीच्या गांजाची शेती सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केली असून यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, काल दि. 4 रोजी रात्रीच्या सुमारास बनगरवाडी, ता. माण येथील शिंगाडेचे शेत नावाच्या शिवारामध्ये एका व्यक्तीने गांजाची शेती केली असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला समजली होती. त्यानुसार काल रात्री सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड पोलिसांनी त्या गांजाच्या शेतीवर धाड टाकली. यावेळी गांजाच्या झाडांची पाने तोडत असताना तिघेजण आढळून आले. या तिघांचीही विचारपूस केली असता ही झाडे गांजाची बाजारात विक्री करण्यासाठी लावण्यात आल्याची कबुली दिली. जिल्ह्यात मागील काही वर्षातील प्रथमच अंमली व मादक द्रव्याची सर्वात मोठी कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून गांजासारख्या अंमली पदार्थ तयार करण्यास शासनाचा प्रतिबंध असतानाही बनगरवाडीमध्ये गांजाची शेती करुन त्याची तस्करी करणार्या तिघांच्या स्थानिक मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यावर अंमली व मादक द्रव्य पदार्थांच्या तस्करी विरोधी गुन्ह्याची नोंद म्हसवड पोलिसांत झाली आहे.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहा. पो.नि. आनंदसिंग साबळे, गणेश वाघमोडे, स.फौ. उत्तम दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे आदींनी सहभाग घेतला होता. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी एलसीबीच्या टीमचे अभिनंदन केले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |