08:56pm | May 26, 2023 |
कराड : भारतातील अग्रगण्य रोगनिदान सेवा पुरवठादार असलेल्या मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडने महाराष्ट्रातील कराड येथे अॅडव्हान्स्ड डायग्नोस्टिक टेस्टिंग सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे प्रगत निदान चाचणी केंद्र १५०० चौरस फूट जागेत उभारलेले असून येथे दररोज जलद गती आणि उच्च दर्जांच्या अहवालासह सुमारे १५० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे.
नवीन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड प्रयोगशाळा ही ४३५/५, मार्केट यार्ड रोड, पटेल पेट्रोल पंपासमोर, भेडा हॉस्पिटलजवळ, शनिवार पेठ, कराड येथील या नवीन प्रयोगशाळेचे उद्घाटन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुशील शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
या नव्या प्रयोगशाळेबाबत बोलताना मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेंद्रन चेमेनकोटिल म्हणाले, कराड शहरात जागतिक दर्जाची प्रयोगशाळा सुरू करणे हे देशाच्या कानाकोपऱ्यात रोगनिदानातील अचूकता आणि सुपर स्पेशालिटी पॅथॉलॉजीचे कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या सुरू असलेल्या मिशनशी सुसंगत आहे. टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये दर्जेदार रोगनिदान सेवांची व्याप्ती मर्यादित असून या नवीन प्रयोगशाळेद्वारे आम्ही ती वाढविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. कराडमध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा असणे हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल ठरेल. त्यामुळे सुमारे ३० गावातील रहिवाशांना त्यांच्या घरापासून पुरेशा अंतरावर सर्वोत्तम रोगनिदान सेवा, उपकरणे आणि डॉक्टर उपलब्ध होतील.
मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे लॅबोरेटरी ऑपरेशन्स (कराड) प्रमुख डॉ. मेरू तहसिलदार म्हणाले, कराडातील रुग्णांच्या सेवेसाठी नवीन आणि अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटर सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, क्षयरोग, कर्करोग, कोव्हिड-१९ यांसह विविध प्रकारच्या चाचण्या करून त्यांचा अहवाल देण्यासाठी आमचे चाचणी केंद्र पूर्णपणे सुसज्ज आहे. नवीन प्रयोगशाळेच्या शुभारंभासोबतच स्थानिक रुग्णालये, तज्ञ आणि चिकित्सकांसह काम करण्यास आणि महाराष्ट्रातील इतर टेस्टिंग सेंटरसोबत जबाबदारी वाटून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. रोगनिदान करण्याच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर रूग्णांना मदत करण्यासाठी आम्ही कायम उभे राहू.
मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी, कराड येथे मूलभूत दररोजच्या पॅथॉलॉजी चाचण्यांपासून ते उच्च दर्जाच्या मोलेक्यूलर डायग्नोसिस चाचण्यांपर्यंत विविध चाचण्या वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतात आणि परदेशात अनेक दशकांचा अनुभव शिरपेचात असलेल्या अनेक दर्जेदार अॅक्रेडिटेशनसाठी तिची ओळख आहे. मेट्रोपॉलिसने व्यापक टेस्ट मेनूसाठी विशेषतः भारतीय संदर्भ श्रेणी विकसित केली असून ती आता भारतातील हजारो प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |